नवी दिल्ली - टाळेबंदीचे नियम शिथील झाल्यानंतर देशातील वाहनांची बाजारपेठ सावरत आहे. अशातच देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पने मॅस्ट्रो एज स्टील्थ स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरची किंमत ७२ हजार ९५० रुपये (एक्स शोरुम दिल्ली) आहे.
मॅस्ट्रो एज १२५ स्टील्थ स्कूटरला १२५ सीसीचे इंजिन आहे. केंद्र सरकारच्या नव्या नियमाप्रमाणे हे इंजिन बीएस-६ क्षमतेचे आहे. तर पॉवर आउटपूट हे ९ बीएचपी आहे.