मुंबई- देशामधील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने भांडवली मूल्यात 'मैलाचा दगड' गाठला आहे. एचडीएफसी ही ७ लाख कोटी रुपयांहून अधिक भांडवली मूल्य असलेली तिसरी कंपनी ठरली आहे. यापूर्वी टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजने हा टप्पा ओलांडला आहे.
एचडीएफसीच्या भांडवली मूल्याची आज 7,00,252.30 कोटी रुपये एवढी नोंद झाली आहे. रिलायन्स ही भांडवली मूल्य असलेली देशातील सर्वात मोठी कंपनी आहे. रिलायन्सचे भांडवली मूल्य हे 9,39,463.36 कोटी रुपये आहे. तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे भांडवली मूल्य हे 8,25,168.16 कोटी रुपये आहे.
हेही वाचा-व्यापार करार : अमेरिकेचे प्रतिनिधी पुढील आठवड्यात येणार भारताच्या दौऱ्यावर