मुंबई - अॅमेझॉन देशात १ अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारतावर मेहेरनजर करत नसल्याचे विधान करणाऱ्या केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांनी 'यू टर्न' घेतला आहे. केंद्र सरकार नियमाचे पालन करत असलेल्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचे स्वागत करत असल्याचे गोयल यांनी म्हटले. ते माध्यमांशी बोलत होते.
पियूष गोयल म्हणाले, जर नियमांचे उल्लंघन करून विदेशातून गुंतवणूक होणार असेल तर आम्ही कारवाई करू. आमच्या सरकारला कोट्यवधी व्यापाऱ्यांविरोधात तसेच देशातील किरकोळ विक्रीमध्ये अनुचित स्पर्धा होणार नाही, याची खात्री हवी आहे. अॅमेझॉनबद्दलचे विधान हे गुंतवणुकीबाबत नकारात्मक अर्थाने घेण्यात आल्याचे गोयल म्हणाले. गुंतवणूक ही केवळ नियमबाह्य असावी, असे म्हटल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातमी वाचा-पियूष गोयल यांच्या वक्तव्यानंतर अॅमेझॉनने 'ही' केली घोषणा