नवी दिल्ली- डिजीटल भारताच्या बांधणीसाठी गुगलने केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाबरोबर केला आहे. या कार्यक्रमात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना बाजारानुरुप, तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प तयार करता येणार आहेत. त्यामधून सामाजिक समस्या सोडविण्यास हातभार लागेल, असे गुगलने म्हटले आहे.
देशभरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून आरोग्य, कृषी, शिक्षण, स्मार्टसिटीज, पायभूत क्षेत्र, स्त्रियांचे सुरक्षितता, स्मार्ट मोबिलिटी, वाहतूक, पर्यावरण आणि डिजीटल साक्षरता आदी विषयांवरील कल्पना आणि उपाय मागविण्यात येणार आहेत. गुगलच्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन शिकता येणार आहे. यामध्ये मशिन लर्निंग, क्लाऊड आणि अँड्राईडच्या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. संरचना, रणनीती आणि तंत्रज्ञान या विषयावरच्या मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात येणार आहे.