लंडन - गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत (आर्टिफिशियल इंटेलिजिन्स) महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे नियमन करण्याची गरज पिचाई यांनी व्यक्त केली आहे. ते ब्रुस्सेल येथील कार्यक्रमात बोलत होते.
सुंदर पिचाई म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या फायद्याबरोबर त्याचे नकारात्मक परिणाम होतात. कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचे नियमन केले पाहिजे, याबाबत माझ्या मनात कोणताही प्रश्न नाही. त्यासाठी उत्तम प्रकारे काय करता येईल, हा प्रश्न असल्याचे पिचाई म्हणाले.
हेही वाचा-दूरसंचार विभागाकडून ऑईल इंडियाला नोटीस; ४८,००० कोटींची मागणी
पिचाई यांचे विधान महत्त्वपूर्ण का आहे?
- युरोपियन युनियनच्या स्पर्धा नियमन संस्थेबरोबर बैठक होण्यापूर्वी पिचाई यांनी कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेवर मत व्यक्त केले आहे.
- कृत्रिम बुद्धिमत्तेवर मर्यादा आणण्यासाठी जगभरातील विविध देश गांभीर्याने विचार करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सुंदर पिचाई यांचे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
- गुगलने २०१८ मध्ये कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर शस्त्रास्त्रे, आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करून होणाऱ्या देखरेखीत करणार नसल्याची प्रतिज्ञा जाहीर केली. तसेच मानव अधिकारांचे उल्लंघन होणाऱ्या कोणत्याही कामात कृत्रिम मानवी बुद्धिमत्तेचा वापर करणार नसल्याचेही गुगलची स्पष्ट भूमिका आहे.
हेही वाचा-युनिटेक कंपनीच्या व्यवस्थापनावर केंद्र सरकारचे येणार नियंत्रण, कारण...