महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

आनंदवार्ता! एअर इंडियासह विस्ताराची देशांतर्गत विमान बुकिंग सुरू - online ticket booking news

विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली थँग म्हणाले, की विमान वाहतूक हे क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंजिन आहे. विमान वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने देशातील स्थिती सामान्यवत होण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला मोठा फायदा होणार आहे.

एअर इंडिया
एअर इंडिया

By

Published : May 22, 2020, 3:34 PM IST

Updated : May 22, 2020, 4:55 PM IST

हैदराबाद - देशांतर्गत विमान प्रवास करू इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. एअर इंडिया आणि विस्तारा कंपनीने देशांतर्गत विमान वाहतुकीसाठी ऑनलाईन बुकिंग आजपासून सुरू केले आहे.

केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत विमान वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यानंतर विमान कंपन्यांनी ऑनलाईन बुकिंग सुरू केले आहे. एअर इंडियाने ट्विटमध्ये म्हटले, आनंदाची बातमी! आमची देशांतर्गत विमान बुकिंग आज दुपारी दीड वाजल्यापासून सुरू झाली आहे. बुकिंगकरता http://airindia.in यावर लॉग इन करावे. मान्यताप्राप्त ट्रॅव्हल एजंट, बुकिंग कार्यालय अथवा ग्राहक मदत केंद्राला संपर्क साधावा.

हेही वाचा-जाणून घ्या, आरबीआयचे गव्हर्नर दास यांच्या पत्रकार परिषदेमधील ठळक मुद्दे

विस्ताराची देशांतर्गत विमान वाहतूक २५ मे २०२० पासून सुरू होणार आहे. विमान कंपनी अंशत: कामकाज सुरू करणार आहे. त्यानंतर हळूहळू प्रमाण वाढविणार आहे. त्यासाठी यंत्रणेकडून परवानगी मिळाली तर हे वेळापत्रकाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

हेही वाचा-आरबीआयकडून दिलासा; कर्जदारांना पैसे भरण्याकरता आणखी तीन महिन्यांची मुदत

विस्ताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी लेस्ली थँग म्हणाले, की विमान वाहतूक हे क्षेत्र अर्थव्यवस्थेच्या वाढीचे इंजिन आहे. विमान वाहतूक पुन्हा सुरू झाल्याने देशातील स्थिती सामान्यवत होण्याच्या सरकारच्या प्रयत्नाला मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी सरकार पावले उचलत असल्याबद्दल आभारी आहोत. सरकारच्या उपक्रमाला मदत करणार आहोत. तसेच कामकाजात सुरक्षितता, स्वच्छतेला सर्वोच्च प्राधान्य देणार आहोत. त्यामधून प्रवाशांचा आमच्यावरील विश्वास कायम राहू शकणार आहे.

हेही वाचा-चालू वर्षात देशाच्या जीडीपीचा विकासदर उणे राहील- आरबीआय गव्हर्नर

Last Updated : May 22, 2020, 4:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details