मुंबई- गो-एअरच्या विमान प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. कंपनीने देशातील १८ विमाने उड्डाणे आज रद्द केली. यामध्ये दिल्ली, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि पाटणामधील विमान सेवांचा समावेश आहे.
स्वस्त दरात विमान सेवा देणाऱ्या गोएअरला नुकतेच काही विमानांतील इंजिनमधील त्रुटीमुळे अडचणींना सामारे जावे लागले होते. गो एअरने मुंबई, गोवा, बंगळरू, दिल्ली, श्रीनगर, जम्मू, पाटना, इंदूर आणि कोलकातामधून जाणारी विमान उड्डाणे रद्द केली आहेत. विमानातील आणि इतर कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने विमान उड्डाणे झाल्याचे सूत्राने सांगितले.
हेही वाचा-दागिन्यांना भाववाढीची झळाळी; सोने १८७ तर चांदी ४९५ रुपयांनी महाग
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन कामकाज विस्कळित झाल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, किती विमान सेवा रद्द झाल्या आहेत, याची कंपनीने माहिती दिलेली नाही.हवामान, कमी दृश्यता आणि देशातील विविध भागात नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आंदोलन सुरू झाल्याने विमान उड्डाणे विस्कळित झाल्याचे गोएअरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तसेच केबीन क्रु कर्मचाऱ्यांना काम करण्याची मर्यादा (एफडीटीएल) असल्यानेही सेवा विस्कळित झाल्याचे प्रवक्त्याने म्हटले आहे.