महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

गोएअरच्या ५ ऑक्टोबरपासून १२ मार्गांवर विमान सेवा वाढणार - Jeh Wadia

नव्या विमान सेवा या गोएअरच्या आक्रमक विस्ताराच्या नियोजनाचा भाग असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जेह वाडिया यांनी सांगितले. यामध्ये ६ नव्या विमान मार्गांचा समावेश आहे. तर सहा विमान मार्गांवर फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

गो-एअर

By

Published : Oct 2, 2019, 8:15 PM IST

मुंबई - विमान कंपनी गोएअरच्या १२ मार्गांवर विमान सेवा वाढविणार आहे. यामध्ये नवीन सेवेसह विमान मार्गावर वाढविण्यात आलेल्या फेऱ्यांचा समावेश आहे.


दिल्ली-चंदीगड, लखनौ-अहमदाबाद आणि कोलकाता-लखनौ मार्गावर नवीन विमान सेवा सुरू होणार आहेत. तर कोलकाता-गुवाहाटी आणि अहमदाबाद-चंदीगड येथील विमान मार्गावर सेवेच्या फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत.

नव्या विमान सेवा या गोएअरच्या आक्रमक विस्ताराच्या नियोजनाचा भाग असल्याचे असल्याचे गोएअरचे व्यवस्थापकीय संचालक जेह वाडिया यांनी सांगितले. यामध्ये ६ नव्या विमान मार्गांचा समावेश आहे. तर सहा विमान मार्गांवर फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये कोलकाता-गुवाहाटी आणि चंदीगड-अहमदाबादचा समावेश आहे.

अहमदाबाद आणि लखनौमधील नव्या विमान सेवेमुळे दोन्ही शहरातील व्यापारी संबंधांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे वाडिया यांनी सांगितले. या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात एसएमएसई उद्योग आहेत. गोएअरची सेवा यापूर्वीच लखनौ ते दिल्ली, मुंबई, बंगळुरू शहरांशी जोडलेले आहे. लखनौ शहर हे देशातील इतर महानगरांशी जोडण्याचे व्हिजन असल्याचे त्यांनी सांगितले.

सध्या, गोएअरच्या रोज ३३० विमानांची उड्डाणे होतात. देशातील २४ ठिकाणी तर आंतरराष्ट्रीय ७ ठिकाणी गो एअरची सेवा देण्यात येते.

ABOUT THE AUTHOR

...view details