नवी दिल्ली - गुगलने देशातील सुमारे ४१५ रेल्वे स्थानकांवरील मोफत वायफायची सुविधा बंद करूनही रेल्वेने प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे स्थानकावरील मोफत वायफायची सुविधा सुरू राहणार असल्याचे रेल्वेने म्हटले आहे.
भारतीय रेल्वे आणि रेलटेल कॉर्पोरेशनबरोबर गुगलने २०१५ ला भागीदारी केली आहे. यामधून रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय देण्याची सुविधा देण्यात येते. हे कंत्राट मे २०२० ला संपणार आहे. रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय देण्यासाठीचे गुगलबरोबरील हे कंत्राटाचे हे पाचवे वर्ष आहे. हा करार मे २०२० ला संपणार असल्याचे रेलटेल या मिनीरत्न सार्वजनिक कंपनीने म्हटले आहे. असे असले तरी, रेलटेलकडून पूर्वीचीच नेटवर्कची गुणवत्ता, वेग असलेली वायफायची सुविधा अंखडितपणे देण्यात येणार आहे. गुगलने या प्रवासात सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभारी आहोत, असेही रेलटेलने म्हटले आहे.
संबंधित बातमी वाचा-रेल्वे स्टेशनवरील गुगलची मोफत वायफायची सेवा होणार बंद, कारण....