महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फ्लिपकार्टला गतवर्षी ३ हजार ८३७ कोटींचा तोटा; कंपनी व्यवहार मंत्रालयाला दिली माहिती - फ्लिपकार्ट तोटा

फ्लिपकार्टला ३१ मार्च २०१८ पर्यंत २ हजार ६३.८ कोटींचा तोटा झाला होता. पेपर व्हीसी या संस्थेच्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या तोट्यात ८५.९१ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी कंपनीच्या महसुलात वर्ष २०१८-१९ मध्ये ४२.८२ टक्के वाढ झाली आहे.

संग्रहित - फ्लिपकार्ट

By

Published : Oct 29, 2019, 5:57 PM IST

Updated : Oct 29, 2019, 9:18 PM IST

नवी दिल्ली - वॉलमार्टच्या मालकीच्या फ्लिपकार्टला वर्ष २०१८-१९ मध्ये ३ हजार ८३६.८ कोटींचा तोटा झाला आहे. ही माहिती फ्लिपकार्टने कंपनी व्यवहार मंत्रालयाला दिली आहे.

फ्लिपकार्टला ३१ मार्च २०१८ पर्यंत २ हजार ६३.८ कोटींचा तोटा झाला होता. पेपर व्हीसी या संस्थेच्या माहितीनुसार फ्लिपकार्टच्या तोट्यात ८५.९१ टक्के वाढ झाली आहे. असे असले तरी कंपनीच्या महसुलात वर्ष २०१८-१९ मध्ये ४२.८२ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०१८-१९ मध्ये ३० हजार ९३१ कोटी महसूल गोळा झाला, तर वर्ष २०१७-१८ मध्ये २१ हजार ६५७.७ कोटींचा महसूल गोळा झाला होता.

हेही वाचा-टाटा मोटर्सचे शेअर १७ टक्क्यांनी वधारले; भांडवली मुल्यात ७ हजार १०३ कोटींची वाढ

फ्लिपकार्टची अॅमेझॉनबरोबर ऑनलाई शॉपिंगच्या व्यवसायात तगडी स्पर्धा आहे. फिल्पकार्ट इंडिया ही मोबाईलसह विविध उत्पादनांचे घाऊक वितरण करते. यामध्ये टेलिव्हिजन, लॅपटॉप, टॅबलेट, मोबाईल अॅक्सेसरी, पादत्राणे व कपडे अशा उत्पादनांचा समावेश आहे. अमेरिकेची रिटेलमधील बलाढ्य कंपनी असलेल्या वॉलमार्टने गतवर्षी ऑगस्टमध्ये फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा घेतला आहे. त्या बदल्यात वॉलमार्टने सॉफ्ट बँकसारख्या गुंतवणूकदारांना चांगला परतावाही दिला आहे.

Last Updated : Oct 29, 2019, 9:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details