महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फ्लिपकार्टकडून बंगळुरुमध्ये मालाची विभागणी करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर - E-commerce company

बंगळुरुमध्ये फ्लिपकार्टने सौक्य येथे प्रकल्पात १०० स्वयंचलित वाहने आणण्यात आली आहेत. पिन कोडप्रमाणे मालाची विभागणी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी या वाहनांचा वापर होणार आहे.

सौजन्य - फ्लिपकार्ट ट्विटर

By

Published : Mar 20, 2019, 3:16 PM IST

नवी दिल्ली - देशात प्रथमच फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स कंपनीकडून मालाची विभागणी करण्यासाठी रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे. या तंत्रज्ञानाचा वापर बंगळुरुमधील फ्लिपकार्टच्या कंपनीत केला जाणार आहे. याशिवाय स्वयंचलित वाहनांचा वापर केला जाणार आहे.

बंगळुरुमध्ये फ्लिपकार्टने सौक्य येथे प्रकल्पात १०० स्वयंचलित वाहने आणण्यात आली आहेत. पिन कोडप्रमाणे मालाची विभागणी करण्यासाठी व कार्यक्षमता वाढविण्यासाठी या वाहनांचा वापर होणार आहे. ही वाहने पॅकेजवर दिलेल्या माहितीवरील कोडवरून विभागणी करतात. तसेच ग्राहकापर्यंत माल पोहोचविण्यासाठी पिनकोडप्रमाणे मालाची वर्गवारी करतात. सध्या असलेल्या मनुष्यबळाचे कौशल्य वाढविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचे फ्लिपकार्टने म्हटले आहे.


ABOUT THE AUTHOR

...view details