नवी दिल्ली - वॉलमार्टची मालकी असलेल्या फ्लिपकार्टने लखनौमध्ये पहिले किराणा मालाचे गोदाम (फुलफिलमेंट सेंटर) करण्याची घोषणा केली आहे. यामधून थेट ५०० जणांना नोकऱ्या मिळणार आहेत.
लखनौमध्ये फ्लिपकार्ट ५० हजार स्क्वेअर फुटांचे फुलफिलमेंट सुरू करणार आहे. यामध्ये लखनौ, कानपूर आणि अलाहाबादमधील ग्राहकांना किराणा माल घरपोहोच पोहोचविण्यात येणार आहे. या फुलफिलमेंट सेंटरमधून प्रत्यक्ष ५०० जणांना तर अप्रत्यक्ष हजारो जणांना पुरवठा साखळी व सुरक्षा अशा विविध नोकऱ्या मिळणार आहेत. कंपनीच्या किराणा मालाच्या व्यवसायातून स्थानिक फळ प्रक्रिया उद्योगांना चालना मिळेल, असा फ्लिपकार्टने विश्वास व्यक्त केला आहे.