नवी दिल्ली - टाळेबंदीच्या काळात ग्राहकांना फ्लिपकार्टवरून ऑनलाईन जीवनावश्यक वस्तुंसह टीव्ही, लॅपटॉप अशा बिगर जीवनावश्यक वस्तू खरेदी करता येणार आहेत. फ्लिपकार्टने शनिवारीपासून (१८ एप्रिल) ग्राहकांच्या ऑनलाईन ऑर्डर सुरू घेण्यास सुरुवात केली आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने टाळेबंदी १५ एप्रिलपासून ३ मेदरम्यान वाढविली आहे. मात्र, २० एप्रिलनंतर जीवनावश्यक वस्तुंसह बिगर जीवनावश्यक वस्तुंच्या वाहनांची वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे ई-कॉमर्स कंपन्यांना ग्राहकापर्यंत वस्तू डिलिव्हरी करणे शक्य होणार आहे. कोरोनापासून कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यात येत असल्याचे यापूर्वीच फ्लिपकार्टने म्हटले आहे.