नवी दिल्ली - आर्थिक संकटात सापडलेल्या येस बँकेत आणखी दोन बँका गुंतवणूक करणार आहेत. येस बँकेचे ३०० कोटी रुपयांचे ३० कोटी शेअर फेडरल बँक खरेदी करणार आहे, तर बंधन बँकही तेवढीच म्हणजे ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने येस बँकेचे बुधवारी (१८ मार्च) तात्पुरते निर्बंध काढल्यानंतर नवीन जबाबदारी घेणार असल्याचे प्रशांत कुमार यांनी सांगितले. या व्यतिरिक्त येस बँकेच्या संचालक मंडळाचे अकार्यकारी संचालक म्हणून महेश कृष्णमूर्ती आणि अतुल भेडा हे कार्यरत राहणार आहेत. केंद्र सरकारने येस बँकेच्या फेररचना आराखड्याच्या योजनेला शुक्रवारी मंजुरी दिली. या आराखड्यानुसार स्टेट बँक ऑफ इंडिया येस बँकेत किमान ४९ टक्के हिस्सा विकत घेवू शकणार आहे. तर किमान तीन वर्षापर्यंत स्टेट बँकेला येस बँकेमधील २६ टक्के हिस्सा विकता येणार नाही.
हेही वाचा-कोरोनाने पर्यटन क्षेत्राची दमछाक; उद्योगाची दिलासा देण्याची सरकारकडे मागणी