सॅन फ्रान्सिस्को -फेसबुकने 1 हजार 196 अकाऊंटस, इन्स्टाग्रामवरून 994 दुर्भावनायुक्त अकाऊंटस तसेच, 7 हजार 947 बनावट पेज आणि 110 ग्रुप्स काढून टाकले आहेत.
ऑक्टोबरमध्ये फेसबुकने अकाऊंटस, पेज आणि ग्रुप्सची 14 नेटवर्क काढून टाकली. त्यापैकी आठ जॉर्जिया, म्यानमार, युक्रेन आणि अझरबैजानमधील होती. त्यांनी आपल्या देशातील घरातील प्रेक्षकांना लक्ष्य केले होते. याशिवाय, इराण, इजिप्त, अमेरिका आणि मेक्सिको येथून असे सहा ग्रुप्स नेटवर्कवरून हटवले. त्यांनी आपल्या देशांबाहेरील लोकांवर लक्ष्य केले होते.
म्यानमारमध्ये 36 फेसबुक अकाऊंटस, सहा पेज, दोन ग्रुप आणि पीआर एजन्सी ओपनमाईंडशी जोडलेले एक इन्स्टाग्राम खाते कंपनीने काढून टाकले.
म्यानमारमध्ये नोव्हेंबरच्या निवडणुकीपूर्वी केलेल्या तपासणीत या प्रदेशातील संशयित समन्वित इनऑथेन्टिक बिहेवियरमध्ये ही नेटवर्क सापडल्याचे फेसबुकने निवेदनात म्हटले आहे.