महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरण : फेसबुकला भरावी लागली 'एवढी' प्रचंड रक्कम - Privacy

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन टेक कंपन्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये फेसबुकच्या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Jul 13, 2019, 4:34 PM IST

Updated : Jul 13, 2019, 6:15 PM IST

वॉशिंग्टन - फेसबुकने केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्याची मोठी आर्थिक झळ बसली आहे. फेसबुकला ५०० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हा दंड फेसबुकला अमेरिकन केंद्रीय व्यापारी आयोगाकडे (एफटीसी) भरला आहे.

फेसबुकने ब्रिटनची राजकीय सल्लागार संस्था केंब्रिज अॅनालिटिकाला ८ कोटी ७० लाखहून अधिक वापरकर्त्यांचा डाटा पुरविला होता. त्यानंतर एफटीसीने गेल्या वर्षी फेसबुकची चौकशी सुरू केली होती. यापूर्वी गुगलला २०१२ मध्ये २२.५ दशलक्ष डॉलरचा दंड एफटीसीकडे भरावा लागला होता. एफटीसी आणि फेसबुकमधील वादाचा मुद्दा हा अमेरिकेच्या न्याय विभागाकडे पुनरावलोकनासाठी पाठविण्यात आला आहे.


फेसबुकने ३ ते ५ अब्ज डॉलर हे दंडासाठी बाजूला काढल्याचे एप्रिलमध्ये म्हटले होते. गोपनीयता अबाधित राखण्यासाठी पावले उचलल्याचेही कंपनीने म्हटले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकन टेक कंपन्यांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमध्ये फेसबुकच्या प्रकरणाकडे पाहिले जात आहे.

Last Updated : Jul 13, 2019, 6:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details