महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

फेसबुक अविश्वासार्ह पोस्टवर आणणार मर्यादा - मोनिका बिकर्ट

इंटरनेटमुळे  गैरवर्तन करण्याची नवी आणि अधिक संधी मिळते. अशा परिस्थितीत हे माध्यम अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी बांधील असल्याचे फेसबुकने म्हटल आहे.

संग्रहित- फेसबुक

By

Published : Sep 13, 2019, 6:13 PM IST

सॅन फ्रान्सिस्को - फेसबुकने अफवा पसरविणाऱ्या व अविश्वासार्ह पोस्ट कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. हानीकारक असलेल्या मजकुराच्या पोस्ट फेसबुककडून कमी करण्यात येणार आहेत.

फेसबुकचे उपाध्यक्ष (जागतिक धोरण व्यवस्थापन) मोनिका बिकर्ट यांनी फेसबुकची भूमिका मांडली. त्या म्हणाल्या,
लोकांना फेसबुकवर विश्वासार्ह मजूकर खात्रीने दिसावा, अशी आमची इच्छा आहे. विश्वासार्हतेने चांगले वातावरण आणि शेअरिंग होवू शकते, यावर आमचा विश्वास आहे. त्यामुळे जे लोक चुकीचे करत आहेत, त्यांनी तसा वापर करू नये, असे मत बिकर्ट यांनी व्यक्त केले.

हेही वाचा-इन्स्टाग्राममधील सुरक्षेची त्रुटी 'त्याने' दुसऱ्यांदा शोधली, २१ लाखानंतर पुन्हा ७ लाखांचे बक्षीस

फेसबुकवर व्यक्त करताना वापरकर्त्याची सुरक्षितता, गोपनियता व प्रतिष्ठा अबाधित राखण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. व्यक्त करण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी आमची बांधिलकी आहे. मात्र इंटरनेटमुळे गैरवर्तन करण्याची नवी आणि अधिक संधी मिळते. हे माध्यम अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी बांधील असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच लोकांना समान अशी प्रतिष्ठा आणि अधिकार देण्यावर विश्वास आहे.

हेही वाचा-अबब... घरात चोरी करणारा निघाला पत्नीचा फेसबुक फ्रेंड

जर एखाद्या मजकुरात बातमीमूल्य आणि जनहित असेल तर समुदायाच्या मानांकनाचा विचार न करता त्याला परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी म्हटले. काही बाबतीत आंतरराष्ट्रीय मानवी हक्काच्या मानांकनाचा विचार करून निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-अमेरिकेत वृत्तपत्र माध्यमांवर संकट, फेसबुक करणार तज्ञ पत्रकारांची नियुक्ती

ABOUT THE AUTHOR

...view details