बंगळुरू - अनअॅकेडमी या ऑनलाईन शैक्षिणिक स्टार्टअप कंपनीमध्ये फेसबुकने ११ कोटी डॉलरची गुंतवणूक केली आहे. अनअॅकडमीमध्ये गुंतवणूक करून इंडियन स्टार्टअप इकोसिस्टिमसाठी बांधिलकी दाखवित असल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
अनअॅकेडमीचे सहसंस्थापक आणि सीईओ गौरव मुंजाल म्हणाले, आमच्या प्रवासात जनरल अॅटलांटिकसह फेसबुक सहभागी झाल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. शिक्षणाचे लोकशाहीकीकरण अधिक करणे, हे आमचे ध्येय आहे. आम्ही केवळ सर्वात मोठी शैक्षणिक संस्था नाही तर सर्वात मोठी इंटरनेटची स्टोरी आहोत. अनअॅकडमीचे ९० हजारांहून अधिक सबस्क्राईबर असल्याचेही त्यांनी सांगितले.