नवी दिल्ली - फेसबुक इंडियाच्या नफ्यात यंदा गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट वाढ झाली आहे. फेसबकुने १३५.७ कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. यंदा कंपनीच्या उत्पन्नात ४३ टक्क्यांनी वाढ होऊन १,२७७.३ कोटींचे उत्पन्न मिळविले आहे.
फेसबुक इंडियाला मागील आर्थिक वर्षात ८९३.४ कोटींचे उत्पन्न मिळाले होते. मागील वर्षात कंपनीला ६५.३ कोटी रुपयांचा नफा मिळाला आहे. ही माहिती मार्केट इंटेलिजिन्स संस्था टोफ्लरने दिली आहे. तर कंपनीचा यंदा निव्वळ नफा १०७ टक्क्यांनी १३५.७ कोटी रुपये आहे. याबाबत विचारले असता फेसबुक इंडियाच्या प्रवक्त्याने भारतीय बाजारपेठ कंपनीसाठी महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. देशाच्या सामाजिक परिवर्तनासाठी समर्थक म्हणून आम्ही बांधील आहोत. लहान आणि मोठ्या उद्योगांना कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याकरता मदत करत आहोत. आम्ही देशामध्ये गुंतणूक सुरुच ठेवणार आहोत, असल्याचे फेसबुकच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.