नवी दिल्ली- वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्यावर अमेरिकेन सरकारकडून कंपन्यांना मोठा दंड ठोठावण्यात येतो. या कायद्याचा दणका इक्विफॅक्ल या संस्थेलाही बसला आहे.
अमेरिकेच्या मध्यवर्ती व्यापार आयोगाने (एफटीसी) इक्विफॅक्सला ७०० दशलक्ष डॉलर म्हणजे सुमारे ४ हजार ९०० कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
इक्विफॅक्सला गोपनीयतेचा भंग केल्याने सुमारे ४ हजार ९०० कोटीचा दंड
इक्विफॅक्सने २०१७ मध्ये १५ कोटी अमेरिकन लोकांची वैयक्तिक संवेदनशील माहिती उघड केली होती. यामुळे वैयक्तिक गोपनीय कायद्याचे उल्लंघन झाले होते.
इक्विफॅक्सने २०१७ मध्ये १५ कोटी अमेरिकन लोकांची वैयक्तिक संवेदनशील माहिती उघड केली होती. यामुळे वैयक्तिक गोपनीय कायद्याचे उल्लंघन झाले होते.
इक्विफॅक्स ही कर्ज जोखीमची माहिती पुरविणारी कंपनी आहे.
फेसबुकलाही भरावा लागणार आहे दंड-
फेसबुकला केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणात वैयक्तिक गोपनीयतेचा भंग केल्याची मोठी आर्थिक झळ बसली आहे. फेसबुकला ५०० अब्ज डॉलर म्हणजे सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. हा दंड फेसबुकला अमेरिकन केंद्रीय व्यापारी आयोगाकडे (एफटीसी) भरावा लागणार आहे.