महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

नवपदवीधरांना नोकऱ्या देण्याकरता कॉर्पोरेट कंपन्या उत्सुक - freshers job in India

टीमलीझने 'करियर आउटलूक रिपोर्ट फेब्रुवारी ते एप्रिल २१' हा अहवाल सादर केला आहे. यामध्ये उद्योग व्यवसाय, विक्री व्यावसायिक, ग्राफिक डिझाईनर, डिजीटल मार्केटिंग असोसिएट्स, मजकूर संपादक आणि वेब डेव्हलपर या नोकऱ्या नवपदवीधरांना मिळू शकत असल्याचे म्हटले आहे.

नवपदवीधर नोकरी संधी
नवपदवीधर नोकरी संधी

By

Published : Feb 17, 2021, 7:24 PM IST

नवी दिल्ली- कॉर्पोरेट कंपन्या नवपदवीधरांना (फ्रेशर्स) नोकऱ्या देण्याकरिता उत्सुक असल्याचे टीमलीज एडटेकच्या अहवालातून दिसून आले आहे. देशातील १५ टक्क्यांहून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी नवपदवीधरांना नोकऱ्या देण्यासाठी तयारी दर्शविली आहे.

टीमलीझने 'करियर आउटलूक रिपोर्ट फेब्रुवारी ते एप्रिल २१' हा अहवाल सादर केला आहे. यामध्ये उद्योग व्यवसाय, विक्री व्यावसायिक, ग्राफिक डिझाईनर, डिजीटल मार्केटिंग असोसिएट्स, मजकूर संपादक आणि वेब डेव्हलपर या नोकऱ्या नवपदवीधरांना मिळू शकत असल्याचे म्हटले आहे. कोरोना महामारीतही नवपदवीधरांसाठी नोकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. फेब्रुवारी ते एप्रिल २०२१ मध्ये नवपदवीधरांच्या नोकऱ्यांचे प्रमाण हे टाळेबंदी ते टाळेबंदी खुली झाल्यानंतर २.५ टक्क्यांनी वाढले आहे. यामध्ये आणखी सुधारणा होईल, असे टीमलीझ ईडटेकचे संस्थापक शंतनू रुज यांनी सांगितले.

हेही वाचा-देशातील १५ राज्यांकडून उद्योगानुकलतेकरता सुधारणा

या आहेत कंपन्यांच्या नवपदवीधरांकडून अपेक्षा

  • नवपदवीधरांकडे उत्पादन आणि जाहिरात सेवा, डाटा अ‌ॅनालिटिक्स, वेब, मोबाईल अ‌ॅप डेव्हलपमेंट आणि स्प्रेडशीट स्किल ही कौशल्ये असावीत, अशी कंपन्यांची अपेक्षा आहे.
  • नवपदवीधरांकडे तार्किकक्षमता, विश्लेषण करण्याची तयारी, जटील समस्या सोडविण्याचे कौशल्य, शिकण्यासाठी सक्रियपणा असे सॉफ्ट स्किल्स असावीत, अशी कंपन्यांची अपेक्षा असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हेही वाचा-दूरसंचार क्षेत्राकरता १२ हजार कोटींच्या पीएलआय योजनेला केंद्राची मंजुरी

ABOUT THE AUTHOR

...view details