नवी दिल्ली - सक्त अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टाटा सन्सचे माजी संचालक आर. वेंकटरामणन यांना एअर एशियाप्रकरणी नोटीस बजावली आहे. नोटीसप्रमाणे वेंकटरामणन यांना १० फेब्रुवारीला दिल्लीमधील ईडीच्या कार्यालयात हजर राहावे लागणार आहे.
मनी लाँड्रिगप्रकरणी ईडीचे अधिकारी टाटा सन्सचे माजी संचालक आर. वेंकटरामणन यांची चौकशी करणार आहेत. टाटा सन्सच्या प्रवक्त्याने म्हटले, आर. वेंकटरामणन यांनी ईडीच्या नोटीसकडे दुर्लक्ष केल्याचे वृत्त चुकीचे आहे. ते चौकशीला हजर राहणार आहेत.