महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

एअर इंडियाचे खासगीकरण मार्गी; बोलीसाठी आराखडा मंजूर - Expression of Interest

इच्छुकांची बोली मागविण्याचा आराखडा आणि एअर इंडियाच्या शेअरची किंमत जानेवारीमध्ये जारी करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.

Air India
एअर इंडिया

By

Published : Jan 7, 2020, 7:55 PM IST

नवी दिल्ली - सरकारी कंपनी एअर इंडियांचे खासगीकरण करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्रीय मंत्रीस्तरीय गटाचे अध्यक्ष केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एअर इंडियाचे खासगीकरण करण्यासाठी इच्छुकांची बोली मागविण्याकरता (एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट) आराखडा मंजूर केला आहे.


इच्छुकांची बोली मागविण्याचा आराखडा आणि एअर इंडियाच्या शेअरची किंमत जानेवारीमध्ये जारी करण्यात येणार आहे. ही माहिती केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. यापूर्वी मंत्रिगटाची बैठक ही सप्टेंबर २०१९ मध्ये पार पडली होती.

संबंधित बातमी वाचा-एअर इंडियाच्या विक्रीकरता इच्छुकांची बोली आमंत्रीत करण्यात येणार

गतवर्षी एअर इंडिया स्पेसिफिक अल्टरटेनिव्ह मेकॅनॅझिम (एआयएसएएम) मंजूर करण्यात आली. तर केंद्र सरकारने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसमधील १०० टक्के शेअर विकण्याचा निर्णय घेतला आहे.

संबंधित बातमी वाचा-एअर इंडिया संकटात! वैमानिकांनंतर अभियंत्यांनीही दिले राजीनामे

ABOUT THE AUTHOR

...view details