महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्पूटनिक लसीच्या चाचणीकरता हैदराबादमधील 'या' कंपनीची सरकारकडे मागणी - स्पूटनिक लस न्यूज

रशियाच्या कोरोनावरील लसीची चाचणी देशात करण्यासाठी हैदराबादमधील कंपनी पुढे आली आहे. जर सरकारने परवानगी दिली तर रशियाची कंपनी या कंपनीला १०० दशलक्ष डोस देणार आहे.

संग्रहित
संग्रहित

By

Published : Oct 3, 2020, 3:11 PM IST

हैदराबाद- शहरातील डॉ. रेड्डीज लॅबोरटरीने भारतीय औषधी नियंत्रण संचालनालयाकडे स्पूटनिक या रशियाच्या लसीच्या चाचणीसाठी परवानगी मागितली आहे. या कोरोनावरील लसीचे तिसऱ्या टप्प्यात मानवी वैद्यकीय चाचणी करण्याचे रेड्डीज लॅबोरटरीचे नियोजन आहे.

डॉ. रेड्डीज लॅबोरटरीने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर (आरडीआयएफ) स्पूटनिक लसीच्या चाचणीसाठी करार केला आहे. जर डीजीसीएने परवानगी दिली तर आरडीआयएएफ ही डॉ. रेड्डीजला लसीचे १०० दशलक्ष डोस पुरविणार आहे.

रेड्डीजला लसीची मानवी चाचणी घेण्याची परवानगी देण्यापूर्वी डीजीसीएकडून तांत्रिक मूल्यांकन केले जाणार असल्याचे सूत्राने सांगितले. स्पूटनिक लसीची तिसरी चाचणी ही १ सप्टेंबरपासून रशियामध्ये घेण्यात येत आहे. ही लस गॅमेलिया नॅशनल रिसर्च सेंटर ऑफ एपिडिमियॉलॉजी आणि मायक्रोबायॉलॉजी आणि आरडीआयएफने विकसित केली आहे.

भारत बायोटेकने कोरोनाची लसची निर्मिती करण्यासाठी आयसीएमआरबरोबर केला आहे. तर झायडस कॅडिला कंपनीने तयार केलेल्या लसीची दुसऱ्या टप्प्यात मानवावर चाचणी घेण्यात येत आहे. पुण्याच्या सिरमनेही कोरोनाच्या लसीच्या निर्मितीसाठी ऑक्सफोर्डबरोबर केला आहे. या लसीचे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात मानवावर वैद्यकीय चाचण्या घेण्यात येत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details