महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

स्पूटनिकचे इतर देशांकरिता उत्पादन घेण्याबाबत डॉ. रेड्डीजची आरडीआयएफबरोबर बोलणी सुरू - स्पूटनिक लस उत्पादन

आरडीआयएफने स्पूटनिक व्ही लशीच्या उत्पादनासाठी भारतामधील सहा औषधी कंपन्या आणि पुरवठांदाराबरोबर करार केले आहेत. हे उत्पादन ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.

Sputnik V
स्पूटनिक

By

Published : May 19, 2021, 3:54 PM IST

हैदराबाद- डॉ. रेड्डीज लॅबोरटरीने रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडबरोबर (आरडीआयएफ) १२.५ कोटी लोकांकरिता लागणारे डोस विकण्यासाठी करार केला आहे. आरडीआयएफने विकसित केलेली स्पूटनिक व्ही लसचे उत्पादन डॉ. रेड्डीज लॅबोरटरीकडून भारतामध्ये करण्यात येणार आहे. इतर देशांसाठीही लस उत्पादित करण्यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरटरीची आरडीआयएफबरोबर बोलणी सुरू आहे.

आरडीआयएफकडून डॉ. रेड्डीजला दोन लाखांहून अधिक डोस मिळाले आहेत. नुकतेच डॉ. रेड्डीजने अपोलो हॉस्पिटल्सबरोबर स्पूटनिक व्हीचे हैदराबादमध्ये सॉफ्ट लाँचिंग केले आहे. डॉ. रेड्डीजचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरेझ इस्रायली म्हणाले, की आम्ही लशींच्या इतर देशांमधील उत्पादन, अधिकार आणि मालमत्ता परवान्याबाबत आरडीआयएफबरोबर चर्चा करत आहोत. सध्या, या स्थितीला आम्ही स्पूटनिकसोबत आहोत.

हेही वाचा-तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल पुन्हा 21 मे पर्यंत तहकूब

१२ महिन्यांत स्पूटनिकच्या १२.५ कोटी डोसचा पुरवठा होईल

स्पूटनिक लाईट या लशीचा कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी एकवेळचा डोस पुरेसा असतो. या लशीच्या भारतामधील भविष्यातील उत्पादनासाठीही चर्चा सुरू असल्याचे इस्त्राइली यांनी सांगितले. आरडीआयएफने स्पूटनिक व्ही लशीच्या उत्पादनासाठी भारतामधील सहा औषधी कंपन्या आणि पुरवठांदाराबरोबर करार केले आहेत. हे उत्पादन ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. येत्या १२ महिन्यांत स्पूटनिकच्या १२.५ कोटी डोसचा पुरवठा होईल, अशी आशा इस्त्राइली यांनी सांगितले.

हेही वाचा-Live update : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गुजरातमध्ये नुकसान पाहणी दौरा, मोदी राज्यात दाखल

  • स्पूटनिक व्ही लशीच्या उत्पादनासाठी डॉ. रेड्डीजने मंगळवारी शिल्पा मेडीकेअरबरोबर करार केला आहे. शिल्पा मेडीकेअरकडून स्पूटनिक व्ही लशीचे उत्पादन कर्नाटकमधील धारवाडमध्ये घेण्यात येणार आहे.
  • स्पूटनिक व्ही लशींचे पहिल्या सहा महिन्यांत ५ कोटी डोसचे उत्पादन घेण्याचे कंपनीने उद्दिष्ट निश्चित केले आहे. डॉ. रेड्डीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने येत्या दोन महिन्यात स्पूटनिक व्हीचे ३.६ कोटी डोस मिळतील, अशी अपेक्षा असल्याचे यापूर्वी म्हटले होते.
  • स्पूटनिक लाईटच्या वैद्यकीय चाचण्यांची आकडेवारी रशियन संस्थेकडून मिळण्यासाठी प्रतिक्षा असल्याचे डॉ. रेड्डीज लॅबोरटरीजच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सोमवारी ईटीव्ही भारतला सांगितले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details