नवी दिल्ली- कंपन्यांनी केलेले स्वमूल्यांकन आणि दूरसंचार विभागाने काढलेले एजीआर शुल्क यामध्ये मोठी तफावत आहे. या फरकाबाबत दूरसंचार विभागाने कंपन्यांना विचारणा करणारे पत्र लिहिले आहे.
एजीआर शुल्कातील फरकाबाबत दूरसंचार विभागाकडून कंपन्यांना विचारणा - केंद्रीय दूरसंचार विभाग
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्या एजीआर शुल्काची दूरसंचार विभागाकडे भरणा करत आहेत. मात्र, त्यांनी स्वमूल्यांकन करत एजीआर शुल्क भरले आहे. प्रत्यक्षात दूरसंचार विभागाच्या थकित शुल्काच्या तुलनेत कंपन्यांनी केलेल्या स्वमूल्यांकनाची रक्कम कमी आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दूरसंचार कंपन्या एजीआर शुल्काचा दूरसंचार विभागाकडे भरणा करत आहेत. मात्र, त्यांनी स्वमूल्यांकन करत एजीआर शुल्क भरले आहे. प्रत्यक्षात दूरसंचार विभागाच्या थकित शुल्काच्या तुलनेत कंपन्यांनी केलेल्या स्वमूल्यांकनाची रक्कम कमी आहे. त्यामुळे दूरसंचार विभागाने कंपन्यांना पत्र लिहून विचारणा केली आहे. कंपन्यांनी त्यांचे व्यवस्थापकीय संचालक, पत्ते इत्यादी माहितीही द्यावी, असे दूरसंचार विभागाने पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा -कोरोनाची चिंता असूनही शेअर बाजार ४७९.६८ अंशांनी वधारला; हे आहे कारण