महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

कॅरीबॅगकरता १४ रुपये आकारणे पडले महागात, डोमिनोजला ५ लाखांचा दंड

ग्राहकांना खोक्यात पिझा देण्यात येतो. त्यामुळे अशा स्थितीत कॅरीबॅग देणे शक्य नाही, अशी बाजू डोमिनोज पिझाने ग्राहक तक्रार निवारण आयोगात मांडली. मात्र, हे म्हणणे आयोगाने फेटाळून लावले.

File - Domino's
संग्रहित - डोमिनोज

By

Published : Dec 20, 2019, 1:29 PM IST

चंदीगड -कॅरीबॅगचे ग्राहकांकडून जादा पैसे आकारणाऱ्या डोमिनोज पिझाला राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने चांगलाच दणका दिला आहे. डोमिनोज पिझाला आयोगाने ४ लाख ९० हजार रुपये पीजीआय रुग्ण कल्याण निधीत जमा करण्याचे आदेश दिले. याशिवाय ग्राहक सहाय्य खात्यावर १० हजार रुपये जमा करण्याचे आदेश दिले.

ग्राहकांना खोक्यात पिझा देण्यात येतो. त्यामुळे अशा स्थितीत कॅरीबॅग देणे शक्य नाही, अशी बाजू डोमिनोज पिझाने ग्राहक तक्रार निवारण आयोगात मांडली. मात्र, हे म्हणणे आयोगाने फेटाळून लावले.

व्यवसायाने वकील असलेले पंकज छडोगोथिया हे चंदीगडमधील रहिवासी आहे. त्यांनी ज्युबिलियंट फुड वर्क्स लिमिटेड, डोमिनोज विरोधात ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली होती. त्यांनी ३०६ रुपयांच्या दोन पिझाची ऑर्डर केली होती. त्यासाठी त्यांच्याकडून कॅरीबॅगसाठी १४ रुपये जादा आकारले होते. हे पैसे आकारण्यात येणार असल्याचे डोमिनोजने कुठेही म्हटले नव्हते. तर डोमिनोजचा लोगो असलेल्या कॅरीबॅगमधून कंपनी जाहिरात करत असल्याचाही त्यांनी ग्राहक तक्रार मंचात दावा केला.

हेही वाचा-वापरकर्त्याने सेटिंगमध्ये बदल केला तरी लोकेशनची मिळते माहिती - फेसबुकची कबुली

जितेंद्र बन्सल या ग्राहकानेही कॅरीबॅगसाठी पैसे आकारल्याने ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. या प्रकरणात ग्राहक तक्रार निवारण मंचाने डोमिनोजला ग्राहकाचे १४ रुपये परत करण्याचे आदेश दिले. तर मानसिक त्रास झाल्यामुळे भरपाई म्हणून १०० रुपये आणि ५०० रुपये कायदेशीर खर्च असे ६०० रुपये देण्याचे आदेशही दिले.

हेही वाचा-'ठेवीदारांच्या हिताकरता एचडीआयएलसह वाधवानची मालमत्ता विकावी'

ग्राहक तक्रार निवारण मंचाने दिलेल्या दोन्ही निकालांविरोधात डोमिनोजने राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात अपील दाखल केले. यावर ग्राहक आयोगाने डोमिनोजला दंड ठोठावून ती रक्कम रुग्णनिधीत जमा करण्याचे आदेश दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details