नवी दिल्ली - स्थावर मालमत्ता क्षेत्रामधील मोठी कंपनी डीएलएफने नवीन गुरुग्राममधील ९ एकर जमीन अमेरिकन एक्सप्रेसला विकली आहे. या जमिनीला परिसरात आजपर्यंत सर्वात अधिक म्हणजे सुमारे ३२ कोटी रुपये प्रति एकर अशी किंमत मिळाली आहे.
खरेदी केलेल्या जमिनीवर अमेरिकन एक्सप्रेसकडून मोठा कॅम्पस विकसित केला जाणार आहे. हा परिसर 'सेक्टर ७४ ए'मध्ये आहे. त्याला न्यू गुरूग्राम म्हणूनही ओळखले जाते. डीएलएफचे व्यवस्थापकीय संचालक (भाडे व्यवसाय) श्रीराम खट्टर आणि डीएलएफ ग्रुपचे सीएफओ अशोक त्यागी यांनी जमीन व्यवहार झालेल्या वृत्ताला पुष्टी दिली आहे. या व्यवहाराने दक्षिण परिसर रस्ता (एसपीआर) आणि एनएच-८ मध्ये जमिनीला मिळणाऱ्या भावाचे एक मानांकन (बेंचमार्क) तयार झाल्याचे श्रीराम खट्टर यांनी म्हटले आहे.