नवी दिल्ली - युपीआयमधून होणाऱ्या व्यवहारात सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी असल्याचा दावा पेटीएमने केला आहे. गेल्या सहा महिन्यात ६०० टक्क्यांनी डिजिटल व्यवहारात वाढ झाल्याचे एका अहवालात म्हटले आहे. येत्या पाच वर्षात डिजीटल पेमेंटची बाजापेठ १ लाख कोटीवर पोहोचणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.
व्हॉट्सअॅपसारख्या बड्या कंपन्या डिजिटल व्यवहार सुरू करण्याच्या तयारीत आहेत. अशा स्थितीतही पेटीएम ही डिजिटल व्यवहारात आघाडीवर असल्याचे क्रेडीट सुईसच्या अहवलात म्हटले आहे.