नवी दिल्ली - दिल्ली न्यायालयाने फोर्टिस हेल्थकेअरचा माजी प्रवर्तक मालविंदर सिंग, त्याचा भाऊ शिविंदर आणि तिघांना चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अटकेतील आरोपींवर रिलीगेअर फिनवेस्ट कंपनीची फसवणूक केल्याचा आरोप आहे. यातून कंपनीचा सुमारे २ हजार ३९७ कोटींचे नुकसान झाले आहे.
दिल्ली न्यायालयाच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी आरोपीची चौकशी करण्यासाठी चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. या आरोपींना दिल्ली पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. मालविंदरला (४६ ) शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली आहे. तर शिविंदर (४४), सुनील गोधवानी (५८), कवी अरोरा (४८) आणि अनिल सक्सेना यांना आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अटक केली आहे.