मुंबई - सायरस मिस्त्री आणि टाटा सन्समधील वादाला नाट्यमय वळण मिळाले आहे. टाटा सन्सचे पुन्हा चेअरमन पद स्वीकारण्यासाठी इच्छा नसल्याचे सायरस मिस्त्री यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात एनसीएलएटीच्या निकालाविरोधात टाटा सन्स, रतन टाटा आणि टीसीएस कंपनीने आव्हान दिले आहे. त्यावर सुनावणी होण्यापूर्वीच मिस्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
सायरस मिस्त्री रविवारी सायंकाळी बोलताना म्हणाले, टाटा ग्रुपच्या हितासाठी चेअरमन पद न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय वैयक्तिक इच्छेहून अधिक महत्त्वाचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.