नवी दिल्ली- प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन न करणाऱ्या काही कंपन्यांना मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) कोक, पेप्सीको, पंतजली आणि बिसलेरीसह विविध कंपन्यांना कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे. या कंपन्यांनी प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापन करताना नियमांचे उल्लंघन केल्याचा सीपीसीबीने ठपका ठेवला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे चेअरमन शिवदास मीना यांनी कोक, पेप्सीको, पंतजली आणि बिसलेरीसह विविध कंपन्यांना पत्र पाठवून दंड ठोठावल्याची नोटीस दिली आहे. कंपन्यांनी विस्तारित उत्पादक जबाबदारीचे (ईपीआर) पालन केले नसल्याचे सीपीसीबीने नोटीसमध्ये म्हटले आहे. सीपीसीबीने कंपन्यांना दंड भरण्यासाठी १५ दिवसांची मदत दिली आहे. सीपीसीबीने पतंजलीला फेब्रुवारीमध्ये पत्र पाठविले होते. मात्र, पंतजली कंपनीने ऑगस्टपर्यंत उत्तर दिले नव्हते. राष्ट्रीय हरित लवादाने सीपीसीबीला पतंजलीवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सीपीसीबीने पंतजलीला दंड ठोठावला आहे.
हेही वाचा-रुपया वधारल्याचा परिणाम; सोन्याच्या दरात अंशत: घसरण