हैदराबाद - कोरोना लस कोव्हॅक्सिनचे उत्पादन ते पुरवठा होण्याकरिता चार महिन्यांचा अवधी लागत असल्याचे भारत बायोटकेने स्पष्ट केले आहे. हा कालावधी तंत्रज्ञान आणि नियामक संस्थांच्या परवानगीवर अवलंबून असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
कोव्हॅक्सिनचे उत्पादन, चाचणी आणि बॅचेस जारी करण्यासाठी १२० दिवसांचा कालावधी लागतो. मार्च महिन्यात उत्पादित झालेली लस ही जून महिन्यात पुरवठ्यासाठी तयार होईल, अशी माहिती भारत बायोटेकने दिली आहे. लशीच्या उत्पादनाकरिता आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळी, उत्पादन, नियामक, राज्य व केंद्र सरकारच्या संस्था यांच्यामध्ये उच्च पद्धतीचे समन्वयाने प्रयत्न होत असतात. लशींचे उत्पादन हे टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया असल्याचे भारत बायोटेकने स्पष्ट केले.
हेही वाचा-कोरोनावरील उपचाराकरिता 'ही' बँक देणार वैयक्तिक कर्ज