कोलकाता - खाणीतील उत्पादन आणि तेथून उत्पादन पाठविणे संपूर्णपणे थांबविण्यात आल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. या खाणी कोल इंडिया आणि सिंगरेनी माईन्सच्या असल्याचे कामगार संघटनांनी म्हटले आहे. कोळसा खाणीत १०० टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात आली आहे. याला विरोध करत कामगार संघटनांनी एक दिवस संप पुकारला आहे.
देशातील ५ कोळसा कामगार संघटना या सीआयएल आणि सिंगरेनीमधील ५ लाखांहून अधिक कामगारांचे प्रतिनिधीत्व करतात. संपामुळे संपूर्ण उत्पादन, वाहतुकीसह इतर काम थांबण्यात आले आहे. यामध्ये आसाम ते सिंगरेनीमधील खाणींचा समावेश असल्याचे अखिल भारतीय कोळसा कामगार संघटनेचे महासचिव डी.डी.रामानंदन यांनी सांगितले.