नवी दिल्ली -मोबाईलचे सिग्नल वाढविणाऱ्या मशिनची ऑनलाईन विक्री होते. या मशिनची विक्री थांबवावी, अशी विनंती मोबाईल ऑपरेटर असोसिएशनने (सीओएआय) ऑनलाईन कंपन्यांकडे केली. त्यानंतरही विक्री सुरुच राहिल्याने सीओएआयने दूरसंचार विभागाकडे कार्यवाहीची मागणी केली आहे.
मोबाईलचे सिग्नल वाढविणाऱ्या मशिनची ऑनलाईन विक्री थांबवा, सीओएआयची दूरसंचार विभागाकडे मागणी
मोबाईल सिग्नल वाढविणाऱ्या मशिन आणि रिपीटर्सची ऑनलाईन विक्री ही नियमबाह्य आहे. या मशीनमुळे मोबाईल ऑपरेटच्या सेवेत अडथळा येत असल्याचे सीओएआयने म्हटले आहे.
मोबाईल सिग्नल वाढविणाऱ्या मशिन आणि रिपीटर्सची ऑनलाईन विक्री ही नियमबाह्य आहे. या मशीनमुळे मोबाईल ऑपरेटच्या सेवेत अडथळा येत असल्याचे सीओएआयने म्हटले आहे. या मशीनची विक्री काही ऑनलाईन कंपन्यांनी थांबविल्याचे सीओएआयने म्हटले आहे. अशा मशीनची विक्री होत असताना दूरसंचार विभागाच्या वायरलेस नियोजन आणि समन्वय विभागाने (डब्ल्यूपीसी) नोंद घ्यावी, अशी मागणी मोबाईल ऑपेरेटर असोसिएशनने केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने म्हटले की, अॅमेझॉन हे ऑनलाईन विक्रीचे माध्यम म्हणून काम करते. विक्रेते त्यांच्या वस्तू अॅमेझॉनद्वारे विकतात. ज्या वस्तुंच्या देशात विक्रीची परवानगी आहे, त्यांचीच विक्री केली जात असल्याचा दावाही अॅमेझॉनच्या प्रवक्त्याने केला आहे. एखाद्या वस्तुच्या विक्रीबाबत प्रश्न उपस्थित झाल्यास विक्रेत्याकडून त्याबाबत आढावा घेण्यात येत असल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.
रिपीटर्स या मशीनच्या आयातीला देशात मनाई असल्याचे सीओएआयने दूरसंचार विभागाला लिहिलेल्या पत्रात म्हटले. त्या मशीनच्या आयातीसाठी दूरसंचार विभागाकडून परवाना घ्यावा लागतो. त्यामुळे उत्पादन शुल्क विभागाकडून अशा मशीनच्या आयातीवर प्रतिबंध करावा, असेही सीओएआयने दूरसंचार विभागाला सुचविले आहे.