महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

सिप्लाची आरटीपीसीआर टेस्ट कीट विराजेन लाँच; 25 मे रोजी बाजारात होणार दाखल - ViraGen in India

कंपनी डायग्नोस्टिकमध्ये आणखी विस्तार सुरुच ठेवणार असल्याचे सिप्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. कंपनीकडून विराजेन या आरटीपीसीआर टेस्ट कीटचा पुरवठा २५ मे २०२१ पासून करण्यात येणार आहे.

RTPCR test kit ViraGen
आरटीपीसीआर टेस्ट कीट

By

Published : May 20, 2021, 8:18 PM IST

नवी दिल्ली - सिप्ला कंपनीने कोरोना चाचणीसाठी आरटी-पीसीआर टेस्ट कीट 'विराजेन' लाँच केली आहे. त्यासाठी सिप्लाने युबायो बायोटेक्नॉलॉजी सिस्टिम्सबरोबर भागीदारी केली आहे.

विराजेन टेस्टिंग कीट लाँच केल्याने टेस्टिंग सेवा आणि क्षमतेची समस्या कमी होण्यासाठी मदत होणार आहे. कंपनी डायग्नोस्टिकमध्ये आणखी विस्तार सुरुच ठेवणार असल्याचे सिप्लाने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे. कंपनीकडून विराजेन या आरटीपीसीआर टेस्ट कीटचा पुरवठा २५ मे २०२१ पासून करण्यात येणार आहे.

विराजेन हे सिप्लाचे कोरोना चाचणीसाठी तिसरे उत्पादन

सिप्लाचे व्यवस्थापकीय संचालक उमंग व्होरा म्हणाले, की सिप्ला कोरोना विरोधातील लढ्यात सहजपणे उपचार होण्यासाठी अथकपणे काम करत आहे. लोकांची काळजी या मुख्य हेतूने आम्ही अशा महत्त्वाच्या वेळी जास्तीत लोकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. विराजेन ही सिप्लाची कोरोना चाचणीसाठी तिसरे उत्पादन असणार आहे.

हेही वाचा-आता घरबसल्या तुम्हीसुद्धा करू शकता कोरोना टेस्ट; पुण्यातील कंपनीने तयार केले किट

सिप्ला कंपनीच्या नफ्यात ७३ टक्क्यांची वाढ-

सिप्ला कंपनीचा चौथ्या तिमाहीत निव्वळ नफा ७३ टक्क्यांनी वाढून ४१२ कोटी रुपये झाला आहे. मुंबईस्थित सिप्लाने जानेवारी २०१९ ते मार्च २०२० दरम्यान २३८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला होता. कोरोना महामारीत औषधांची मागणी वाढल्याने सिप्लाच्या नफ्यात वाढ झाली आहे.

हेही वाचा-'तुमची तयारी असेल, तर लसीकरणासाठी केंद्राच्या परवानगीची वाट नको'

प्रति शेअर ५ रुपये लाभांश जाहीर

कंपनीने वर्ष २०२०-२१ साठी प्रति शेअर ५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. गतवर्षी सिप्लाला डीसीजीआयकडून फेवेपिरावीर हे औषध सिप्लेन्झा नावाने उत्पादन करण्याची मंजुरी दिली होती. सिप्लाकडून रेमडेसिवीरचेही उत्पादन घेतले जात आहे.

कोविसेल्फमधून घरी करता येणार कोरोना चाचणी

दरम्यान, पुण्यातील 'मायलॅब' या कंपनीने कोविसेल्फ नावाचे एक अँटीजन किट तयार केले आहे. याद्वारे घरबसल्या स्वतः कोरोना चाचणी करता येणार आहे. या किटला भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) देखील मान्यता दिली आहे. या किटची किंमत फक्त २५० रुपये इतकी असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details