कोलकाता - रोजगारांचे प्रमाण कमी झाले असताना सरकारी कोल इंडिया कंपनीने यंदा नोकऱ्यांचे प्रमाण वाढविले आहे. कोल इंडियामध्ये सुमारे ७ हजार जागा भरण्यात येणार आहे.
कोल इंडिया ही जगातील सर्वात मोठी कोळसा उत्खनन करणारी कंपनी आहे. खाणकाम हे अधिक आधुनिक, स्वयंचलित आणि पर्यावणस्नेही होत असताना कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढले आहे. कोल इंडिया ही २ हजार कार्यकारी अधिकाऱ्यांना अंतर्गत बढतीच्या प्रक्रियेतून सेवेत घेणार आहे. बढतीमधील अनेक कायदेशीर अडथळे दूर करण्यात आल्याचे सूत्राने सांगितले. कोल इंडियामध्ये दरवर्षी ६ हजार जागा भरण्यात येतात. यंदा हे प्रमाण वाढविल्याचे कंपनीमधील सूत्राने सांगितले आहे.
हेही वाचा-डिजीटल मीडियाने खासगी शिक्षकांना 'अच्छे दिन''; नोकऱ्यांच्या संख्येत ४० टक्के वाढ
कोल इंडियाच्या ८ उपकंपन्या आहेत. कंपनीमधून दरवर्षी सरासरी १ हजार अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यात येते. मात्र यंदा नव्याने २ हजार अधिकाऱ्यांना सेवेत घेण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.