महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

चिनी स्मार्टफोन कंपनी वापरणार इस्रोचे 'हे' तंत्रज्ञान

भारताची स्वदेशी असलेली नाविक ही जीपीएस यंत्रणा जगात प्रथमच रेडमी वापरणार आहे. शाओमी इंडियाने इस्रोच्या नाविक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी करार केल्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी बुधवारी केली आहे.

Xiomi India Director with ISRO director
मनू कुमार जैन व इस्रोचे संचालक

By

Published : Feb 27, 2020, 12:46 PM IST

बंगळुरू- चिनी मोबाईल कंपनी शाओमी भौगोलिक स्थलदर्शन प्रणालीसाठी (जीपीएस) इस्रोच्या नाविकचा (एनएव्हीआयसी) वापर करणार आहे. हे तंत्रज्ञान भारतीय उपग्रहाच्या सहाय्याने वापरण्यात येते.

भारताची स्वदेशी असलेली नाविक ही जीपीएस यंत्रणा जगात प्रथमच 'रेडमी'मध्ये वापरण्यात येणार आहे. शाओमी इंडियाने इस्रोच्या नाविक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी करार केल्याची घोषणा कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मनू कुमार जैन यांनी बुधवारी केली आहे.

हेही वाचा-जागतिक श्रीमंताच्या यादीत सलग तिसऱ्यांदा जेफ बेझोस अव्वल; जाणून घ्या, मुकेश अंबानींचा क्रमांक

सध्या, रेडमी स्मार्टफोनमध्ये क्वालकोम्न स्नॅपड्रॅगनचा वापर करून क्वालकोम्न तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो. हे तंत्रज्ञान शिओमीच्या सर्व स्मार्टफोनमध्ये वापरण्यात येणार आहे.

काय आहे नाविक यंत्रणा?

नाविक (एनएव्हीआयसी) हे भारतीय प्रादेशिक नौवहन उपग्रह व्यवस्थेला (आयआरएनएसएस) देण्यात आलेले नाव आहे. हे तंत्रज्ञान भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) विकसित केलेले आहे. आयआरएनएसएस यंत्रणेसाठी सात उपग्रह अवकाशात सोडण्यात आलेले आहे. हे भारत आणि शेजारील देशांचा सुमारे १ हजार ५०० किलोमीटर अंतरावर देखरेख ठेवू शकतात.

हेही वाचा-शेतकऱ्यांना दिलासा..! सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली

दुर्गम भागात स्थळ चिन्हांकित करणे (लोकेशन मॅपिंग), वाहन चालकाला ध्वनीसंचलित आणि व्हिडिओच्या मदतीने नौवहन (नेव्हिगेशन) करणे आदी सुविधा नाविकने घेता येणार आहेत. भौगोलिक स्थलदर्शन प्रणाली (जीपीएस) ही अमेरिकेने विकसित केलेले तंत्रज्ञान आहे. अमेरिकेने सोडलेल्या ३० उपग्रहाच्या सहाय्याने संपूर्ण जगाचे नौवहन करणे शक्य होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details