महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

डिश टिव्हीला 4,164 कोटी रुपये भरण्याची केंद्राकडून नोटीस - DishTV on license fee

प्रसारण मंत्रालयाची २४ डिसेंबरला नोटीस आल्याची माहिती डिशटिव्हीने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. या नोटीसप्रमाणे डिश टिव्हीला आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ४,१६४.०५ कोटी रुपयांचे परवाना शुल्क भरावे लागणार आहे.

डिश टिव्ही
डिश टिव्ही

By

Published : Dec 28, 2020, 8:10 PM IST

नवी दिल्ली- केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने डिश टिव्हीला परवाना शुल्क भरण्यासाठी नोटीस पाठविली आहे. या नोटीसप्रमाणे डिश टिव्हीला १५ दिवसांत शुल्क भरण्याची सूचना मंत्रालयाने केली आहे.

प्रसारण मंत्रालयाची २४ डिसेंबरला नोटीस आल्याची माहिती डिशटिव्हीने शेअर बाजाराला माहिती दिली आहे. या नोटीसप्रमाणे डिश टिव्हीला आर्थिक वर्ष २०१८-१९ साठी ४,१६४.०५ कोटी रुपयांचे परवाना शुल्क भरावे लागणार आहे. त्यासाठी मंत्रालयाने १५ दिवसांची मुदत दिली आहे. मात्र, डिशटिव्हीने सरकारने दिलेल्या नोटीसप्रमाणे शुल्क भरण्यासाठी पडताळणी आणि लेखापरीक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. कारण विविध प्रकरणे हे दूरसंचार वाद निवारण आणि अपिलीय प्राधिकरणाकडे प्रलंबित आहेत.

हेही वाचा-year Ender 2020: उद्योगजगताच्या वर्षभरातील ठळक घडामोडींचा मागोवा

परवाना शुल्काच्या रकमेबाबत डिश टिव्ही असहमत-

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मागणी केलेल्या परवाना शुल्काशी सहमत नसल्याचे डिशटिव्हीने म्हटले आहे. नोटीसबाबत अभ्यास करत असल्याचे डिशटिव्हीने म्हटले आहे. डिश टिव्हीच्या शेअरमध्ये सोमवारी ५.९४ टक्क्यांनी घसरण झाली आहे. डिशच्या प्रति शेअरची किंमत १३.९४ रुपये आहे. डिश टिव्हीला केंद्र सरकारकडून डीटीएचचा २००३ मध्ये परवाना मिळाला होता.

हेही वाचा-टिप्स इंडस्ट्रीजचे संगीत व व्हिडिओ फेसबुकसह इन्स्टाग्रामवर वापरता येणार; दोन्ही कंपन्यांमध्ये करार

ABOUT THE AUTHOR

...view details