नवी दिल्ली - कर्जाचे व्याजदर कमी करूनही वाहन विक्रीत वाढ झालेली नाही. जानेवारीतील वाहन विक्रीचे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत ८ टक्क्यांनी कमी झाले आहे. जानेवारीत गतवर्षीहून १४ हजार ५३१ वाहनांची कमी विक्री झाली आहे.
वाहन उद्योगांची संघटना सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चुअर्सने (एसआयएएम) वाहन विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. वाहनांच्या वाढणाऱ्या किमती आणि राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या विकासदरात घसरण झाल्याने वाहनांची विक्री कमी होत असल्याचे एसआयएएमने म्हटले आहे.