नवी दिल्ली– चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेनजीक केलेल्या कुरापतीखोर वागणुकीचा अखिल भारतीय व्यापारी संघटेनेने (सीएआयटी) निषेध केला आहे. चीनमधून आयात करण्यात येणाऱ्या 450 उत्पादनांवर व्यापारी संघटनेने बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे.
चीनी उत्पादनांची बहिष्कारातून डिसेंबर 2021 पर्यंत 1 लाख कोटी रुपयांच्या वस्तुंची आयात कमी करण्याचा उद्देश आहे. सध्या, भारत चीनमधून 5.25 लाख कोटी रुपयांच्या वस्तुंची आयात दरवर्षी करतो. सीएआयटीने पहिल्या टप्प्यात 500 श्रेणीतील 3 हजार उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. ही उत्पादने कमी खर्चात देशात तयार होवू शकतात. तरीही या उत्पादनांची चीनमधून आयात करण्यात येते. त्या वस्तुंच्या उत्पादनासाठी कोणतेही तंत्रज्ञान लागत नाही. जरी तसे तंत्रज्ञान लागत असले तरी आपल्याकडे तसे तंत्रज्ञान आहे. स्वदेशी जागरण मंचकडून चीनी उत्पादनांवर बंदीची मागणी