नवी दिल्ली- केंद्र सरकारने प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी बीएस-६ या प्रकारचे इंजिन वाहन कंपन्यांना बंधनकारक केले आहे. त्याचा परिणाम देशात उत्पादित होणाऱ्या दुचाकींच्या किमतीवर होणार असल्याचे इंडिया यामाहा मोटरने (आयवायएम) म्हटले आहे. दुचाकींच्या किमती सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढतील, असे यामाहाने म्हटले आहे.
दुचाकीसह स्कूटरमध्ये बीएस-६ इंजिन बसविण्यासाठी यामाहा कंपनीला रचनेत बदल करावे लागणार आहेत. यामधील यामाहाच्या दुचाकीसाठीचा पहिला टप्पा नोव्हेंबर २०१९ पासून सुरू होणार आहे. तर स्कूटरसाठीच्या पहिला टप्प्याचे काम जानेवारी २०२० मध्ये सुरू होणार आहे.