नवी दिल्ली- जैवतंत्रज्ञान कंपनी बायोकॉनच्या सायटोसॉर्ब या वैद्यकीय उपकरणाचा कोरोना रुग्णासाठी वापर करण्याला सरकारने परवानगी दिली आहे. कोरोनामुळे अतिगंभीर असलेल्या रुग्णाचे अवयव निकामी होण्यापासून वाचविण्यासाठी या वैद्यकीय उपकरणाचा वापर करण्यात येणार आहे.
बायकॉन बायॉलॉजी कंपनी रक्तशुद्धीकरणाचे सायटोसॉर्ब उपकरण विकसित केले आहे. हे यापूर्वी इतर रोगांमध्ये वापरण्यात येत होते. या उपकरणाला औषधी नियंत्रक संचालनालयाने (डीसीजीआय) परवानगी दिली आहे.