महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बायकॉन बायोलॉजिक्समध्ये गोल्डमॅन सॅच्सकडून १,१२५ कोटी रुपयांची गुंतवणूक - बायोकॉन बायोलॉजिक्स न्यूज

बायोकॉनच्या कार्यकारी चेअरमन किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या, की गोल्डमॅन सॅच्सच्या गुंतवणुकीचे आम्ही अत्यंत आनंदाने स्वागत करत आहोत. या गुंतवणुकीनंतर बायोकॉन बायोलॉजिक्सचा प्रवास हा जागतिक भागीदारीत आणि परवडणाऱ्या जैविक औषधांचा पुरवठादार म्हणून होणार आहे.

किरण मुझुमदार-शॉ
किरण मुझुमदार-शॉ

By

Published : Nov 7, 2020, 7:24 PM IST

नवी दिल्ली - बायोकॉनची मालकी असलेल्या बायकॉन बायोलॉजिक्समध्ये गोल्डमॅन सॅच्सने १,१२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीमुळे बायोकॉनला संशोधन आणि विकास तसेच उच्च दर्जाच्या उत्पादनांसाठी नवीन विस्तार करता येणे शक्य होणार आहे.

बायोकॉन बायोलॉजिक्सच्या संचालक मंडळाने गोल्डमॅन सॅच्सच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. बायोकॉनच्या कार्यकारी चेअरमन किरण मुझुमदार-शॉ म्हणाल्या, की गोल्डमॅन सॅच्सच्या गुंतवणुकीचे आम्ही अत्यंत आनंदाने स्वागत करत आहोत. या गुंतवणुकीनंतर बायोकॉन बायोलॉजिक्सचा प्रवास हा जागतिक भागीदारीत आणि परवडणाऱ्या जैविक औषधांचा पुरवठादार म्हणून होणार आहे.

बायोकॉन बायोलिजिक्सचे सीईओ ख्रिस्टिन हॅमशर म्हणाले, की आमच्या तीन उत्पादनांसह चार पेटंट उत्पादनांच्या मदतीने अमेरिकेच्या बाजारपेठेत प्रवेश करणार आहोत. गोल्डमॅन सॅच्सचे व्यवस्थापकीय संचालक सोम कृष्णा म्हणाले, की बायोकॉन बायोलॉजिक्समध्ये जागतिक औषधी कंपन्यांमध्ये आघाडीची कंपनी होण्याची क्षमता आहे. बायॉकॉन बायॉलिजिक्समध्ये विवध इन्शुलिन औषधांची निर्मिती करण्यात येते.

कोण आहेत किरण-शॉ?

बायोकॉन लिमिटेडच्या कार्यकारी अध्यक्ष किरण मुजुमदार-शॉ यांना यंदाचा जागतिक उद्योजक पुरस्कार देण्यात आला. मुजूमदार-शॉ यांना यापूर्वी २००२ मध्ये हेल्थकेअर अँड लाइफ सायन्सेस पुरस्कार, फेब्रुवारी २०२० मध्ये ईवाय एंटरप्रेन्योर ऑफ द इयर इंडिया २०१९ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच त्यांनी डब्ल्यूईओई २०२० मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details