हैदराबाद- देशात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना कोव्हॅक्सिन उत्पादक कंपनी भारत बायोटेकने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत बायोटेकने कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्यास सुरुवात केली आहे.
रिपोर्टच्या माहितीनुसार उपलब्ध असलेल्या सुविधांचा वापर करून भारत बायोटेक लस उत्पादन वाढविणार आहे. त्यासाठी भारत बायोटेक ही दुसऱ्या कंपनीबरोबर करार करणार आहे. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात लशीचा तुटवडा जाणवत आहे. दिल्लीस्थित पॅनासिया बायोटेक कंपनीबरोबर उत्पादन वाढविण्यासाठी कंपनी चर्चा करत असल्याचे रिपोर्टमध्ये भारत बायोटेकने म्हटले आहे. सध्या कोव्हॅक्सिनचे उत्पादन हे हैदराबादमधील जिनोम व्हॅलीमधील बायोसेफ्टी लेव्हल -3 (बीएसएल-3) मध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय भारत बायोटेककडून बंगळुरूमधील सुविधांचा वापर करून कोव्हॅक्सिनचे उत्पादन वाढविण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सध्या बंगळुरूमधील उत्पादन प्रकल्प हा प्राण्यांच्या लशींसाठी वापरण्यात येत आहे.
हेही वाचा-कोरोनाचा फटका; 22 वर्षानंतर पहिल्यांदाच देशातील इंधनाच्या मागणीत घसरण
कोव्हॅक्सिन ही एकमेव संपूर्ण स्वदेशी लस-