हैदराबाद- भारत बायोटेकने अमेरिकन कंपनी ओक्युजेनबरोबर कॅनडामध्ये लशीची व्यावसायिक विक्री करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारत बायोटेकने 2 फेब्रुवारी 2021 ला अमेरिकेमध्ये ओक्युजेन या जैवऔषधी कंपनीबरोबर केला आहे. या करारानुसार भारत बायोटेक ही ओक्युजेन कंपनीला कोव्हॅक्सिनची अमेरिकेत पुरवठा आणि विक्रीची परवानगी देणार आहे.
ओक्युजेन कंपनीने कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परवानगीसाठी अमेरिकेसह कॅनडाच्या नियामक संस्थेकडे अर्ज केला आहे. ओक्युजेनचे सहसंस्थापक आणि सीईओ शंकर मुसुनुरी म्हणाले, की कोव्हॅक्सिनच्या आमच्या हक्कांमध्ये विस्तार म्हणजे भारत बायोटेकशी बळकट संबंधाचे प्रतिक आहे. आमच्या संयुक्त योगदानातून अतिरिक्त देशांना लस मिळणार आहे. कॅनडामधील कोव्हॅक्सिनच्या विक्रीत ओक्युजेनचा 45 टक्के हिस्सा असणार आहे. भारत बायोटेकचे चेअरमन कृष्णा इल्ला म्हणाले, की कोव्हॅक्सिन ही मानवी चाचणीमध्ये अत्यंत सुरक्षित असल्याचे आढळले आहे.
हेही वाचा-खूशखबर! स्पाईसजेटकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना विमान तिकिटात ३० टक्क्यांपर्यत सवलत
जागतिक आरोग्य संघटनेकडून जुलै ते सप्टेंबरपर्यंत मिळणार परवानगी
कोरोना लस कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन वापरासाठी जुलै ते सप्टेंबरपर्यंत परवानगी मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला 60 हून अधिक देशांमध्ये नियामक संस्थांकडून परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये अमेरिका, ब्राझील आणि हंगेरी या देशांचा समावेश असल्याचे भारत बायोटेकने म्हटले आहे.
हेही वाचा-बँकांना विजय मल्ल्याची 5,646 कोटी रुपयांची मालमत्ता विकण्याचा मार्ग मोकळा
जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या लहान मुलांवर होणार चाचण्या-
देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना अधिक धोका असल्याचे कित्येक संशोधकांचे म्हणणे आहे. ही लाट कधी येईल याबाबत कोणालाही अंदाज नसला, तरी तिला तोंड देण्याच्या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न करण्यात येत आहेत. कोव्हॅक्सिन या कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेकने आता लहान मुलांवरील क्लिनिकल चाचण्या सुरू करण्याबाबत संकेत दिले आहेत. जून महिन्यापासून या चाचण्या सुरू होणार आहेत, असे कंपनीच्या बिझनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अॅडव्होकसी प्रमुख डॉ. राचेस एल्ला यांनी सांगितले.