महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बँक ऑफ महाराष्ट्राला केंद्राकडून मिळाले २०५ कोटींचे आर्थिक भांडवल - government bank

शेअर बाजारात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरमध्ये ५.५५ टक्क्याने वाढ होऊन १४.४५ रुपयापर्यंत शेअरचा भाव पोहोचला.

बँक ऑफ महाराष्ट्र

By

Published : Apr 1, 2019, 4:51 PM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून बँक ऑफ महाराष्ट्राला २०५ कोटींचे आर्थिक भांडवल मिळाले आहे. त्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राने सरकारला ३० मार्चला शेअर विकले आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्राची ३० मार्चला बैठक झाली. यामध्ये केंद्र सरकारला १५ कोटी ४७ लाख १६ हजार १८१ शेअर देण्यासाठी मंजुरी देण्यात आली. प्रत्येकी १३.२५ रुपये किंमत असलेल्या या शेअरची एकूण किंमत २०५ कोटी रुपये एवढी आहे. ही माहिती बँक ऑफ महाराष्ट्राने शेअर बाजारात दिली आहे. या शेअरच्या खरेदीमुळे बँक ऑफ महाराष्ट्रातील सरकारचा हिस्सा हा ८७.०१ टक्क्यावरून ८७.७४ टक्के झाला आहे.

शेअर बाजारात बँक ऑफ महाराष्ट्राच्या शेअरमध्ये ५.५५ टक्क्याने वाढ होऊन १४.४५ रुपयापर्यंत शेअरचा भाव पोहोचला.

ABOUT THE AUTHOR

...view details