महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

बजाजच्या वाहनांच्या विक्रीत मार्चमध्ये 52 टक्क्यांनी वाढ - बजाज ऑटो वाहन विक्री न्यूज

कंपनीने मार्चमध्ये देशात एकूण 1,98,551 वाहनांची विक्री झाली होती. तर गतवर्षी 1,16,541 वाहनांची मार्चमध्ये विक्री झाली होती, ही माहिती बजाज कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

Bajaj Auto
बजाज

By

Published : Apr 2, 2021, 4:21 PM IST

नवी दिल्ली -बजाज ऑटोच्या सर्व श्रेणीतील 3,69,448 वाहनांची मार्चमध्ये विक्री झाली आहे. पुण्यामध्ये मुख्य कार्यालय असलेल्या बजाजच्या सर्व श्रेणीतील 2,42,575 वाहनांची मार्च 2020 मध्ये विक्री झाली होती. तेव्हा कोरोनामुळे पुरवठा साखळी विस्कळित झाली होती.

  • कंपनीने मार्चमध्ये देशात एकूण 1,98,551 वाहनांची विक्री झाली होती. तर गतवर्षी 1,16,541 वाहनांची मार्चमध्ये विक्री झाली होती, ही माहिती बजाज कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

हेही वाचा-मारुतीसह टोयोटाच्या वाहन विक्रीत मार्चमध्ये दुप्पटीने वाढ

  • गेल्या महिन्यात बजाज ऑटोच्या 3,30,133 दुचाकींची विक्री झाली आहे. तर मागील वर्षात मार्चमध्ये 2,10,976 वाहनांची विक्री झाली होती. मार्चमध्ये बजाजच्या एकूण 39,315 वाणिज्य वाहनांची विक्री झाली आहे. तर या श्रेणीमध्ये 31,599 वाहनांची मार्चम 2020 मध्ये विक्री झाली होती.
  • बजाज ऑटोच्या 1,70,897 वाहनांची मार्चमध्ये निर्यात झाली होती. तर मार्च 2020 मध्ये 1,26,034 वाहनांची विक्री झाली होती.
  • आर्थिक वर्ष 2020-21 कंपनीच्या 39,72,914 वाहनांची विक्री झाली होती. हे प्रमाण 2019-20 च्या तुलनेत 14 टक्क्यांनी कमी होते. 2019-20 मध्ये बजाजच्या 46,15,212 वाहनांची विक्री झाली होती.
  • मागील आर्थिक वर्षात देशात वाहनांच्या विक्रीत 2019-20 च्या तुलनेत 21 टक्के घसरण झाली होती.

हेही वाचा-जीएसटी संकलनाचा आजपर्यंतचा उच्चांक; मार्चमध्ये 1.23 लाख कोटी जमा

फेब्रुवारीमध्ये वाहनांच्या विक्रीत वाढ-

बजाज ऑटोच्या वाहनांच्या विक्रीत फेब्रुवारी 2021 मध्ये 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारीमध्ये 3 लाख 75 हजार 17 वाहनांची विक्री झाली आहे. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये 3 लाख 54 हजार 913 वाहनांची विक्री झाली होती.

दरम्यान, कोरोनाच्या काळात वाहन उद्योगाला फटका बसला होता. टाळेबंदी खुली झाल्यापासून बहुतांश कंपन्यांच्या वाहन विक्रीत वाढ होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details