महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / business

रेल्वेतून ऑटोमोबाईल वाहनांची वाहतूक सुसाट, यंदा लोडिंगमध्ये १४६ टक्क्यांनी वाढ - रेल्वे वाहतूक व्यापार न्यूज

मध्य रेल्वेकडून गेल्या वर्षीपेक्षा यंदा ऑटोमोबाईल उत्पादनाची विक्रमी वाहतूक केली आहे. चालू वर्षाच्या लोडिंगमध्ये १४६ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. बांगलादेशातही निर्यात केली गेली. उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून वाहतुकीची गतीही रेल्वेने वाढविली आहे.

automobile-transport
automobile-transport

By

Published : Mar 23, 2021, 12:31 PM IST

मुंबई : मध्य रेल्वेकडून गेल्या वर्षी पेक्षा यंदा ऑटोमोबाईल उत्पादनाची विक्रमी वाहतूक केली आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारी २०२० मध्ये १२ रेक लोड करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा ३२ रेक लोड करत रेल्वेने स्वतःचाच विक्रम मोडला आहे.

वाहन उद्योग रेल्वेची वाहतुकीसाठी अधिक रुची -

मध्य रेल्वेने क्षेत्रीय आणि विभागीय स्तरावर व्यवसाय विकास युनिट (बीडीयू) स्थापित केले आहेत. हे व्यवसाय विकास युनिट स्थानिक उद्योगांसह नवीन प्रस्ताव आणि लवचिक योजनांचे मार्केटिंग करतात. तसेच, त्यांच्या मागण्यांचे विश्लेषणही करतात. अशा उपक्रमांसाठी मेसर्स महिंद्रा अँड महिंद्रा, मेसर्स टाटा मोटर्स आणि मेसर्स मारुती उद्योग या प्रमुख मोटार वाहन उद्योगातील कार, पिक-अप व्हॅन, ट्रॅक्टर, जीप इत्यादीच्या वाहतुकी संदर्भात बैठका आयोजित केल्या गेल्या. त्यामुळे वाहन उद्योग रेल्वेने वाहतुकीसाठी अधिक रुची दाखविली आहे. चालू आर्थिक वर्षात मोटारींच्या वाहतुकीच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट दिसून येते.

हेही वाचा -मारुती सुझुकीकडून वर्षभरातच दुसऱ्यांदा वाहनांच्या किमतीत वाढ

वाहनांच्या लोडिंगसाठी रेल्वेकडून सुविधा -
वाहनांच्या लोडिंगसाठी रेल्वेकडून ऑटोमोबाईल कंपन्यांना सुविधा देखील देण्यात येत आहेत. मुंबई विभागातील कळंबोली, भुसावळ विभागातील नाशिक रोड, पुणे विभागातील चिंचवड स्टेशन, सोलापूर विभागातील बाळे स्टेशन व नागपूर विभागातील अजनी स्थानक येथे वाहनांच्या वाहतुकीसाठी लोडिंग सुविधा विकसित करण्यात आल्या आहेत.

वाहनांच्या वाहतुकीत १४६ टक्क्यांनी वाढ -
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेब्रुवारी २०२१ मध्ये रेल्वेने ३२ रेक लोड केले आहेत. तर फेब्रुवारी २०२० मध्ये १२ रेक लोड केले होते. म्हणजे फेब्रुवारी २०२१ मध्ये १६६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ऑटोमोबाईलच्या २४६ रेकची लोडिंग झाली आहे. तर एप्रिल २०१९ ते फेब्रुवारी २०२० या कालावधीत ११८ रेक लोड झाले होते. चालू वर्षाच्या लोडिंगमध्ये १४६ टक्क्यांनी वाढ दिसून आली आहे. दरम्यान, गेल्या वर्षभरात ऑटोमोबाईलची वाहतूक देशाच्या विविध भागात केली गेली. बांगलादेशातही निर्यात केली गेली. रेल्वेच्या या उपक्रमामुळे मौल्यवान इंधनाच्या बचतीसह कार्बन फूटप्रिंटची बचत झाली.

हेही वाचा -परमबीर सिंग यांच्यावर लावलेल्या आरोपांवर ठाम - पोलीस निरीक्षक अनुप डांगे

प्रोटोटाइप कोचची निर्मिती -
ऑटोमोबाईल उत्पादकांशी व्यवसाय विकास युनिटच्या संवादादरम्यान रेल्वेने त्यांच्या सूचनांचेही स्वागत केले. मध्य रेल्वेच्या परळ कार्यशाळेने ऑटोमोबाईल वाहनांना सहजपणे लोड करण्यासाठी व वाहून नेण्यासाठी प्रोटोटाइप कोच विकसित केला आहे. तसेच, उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या सूचनांचा विचार करून वाहतुकीची गतीही रेल्वेने वाढविली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details