सिडनी- चारचाकी कंपनी फोक्सवॅगनला ऑस्ट्रेलियन न्यायालयाने ८.६ कोटी अमेरिकन डॉलरचा (सुमारे ६१२ कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. डिझेलवर चालणाऱ्या चारचाकीमधून उत्सर्जन होण्याचे प्रमाण दाखविताना छेडछाड केल्याचा कंपनीवर आरोप आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मध्यवर्ती न्यायालयाने ठोठावलेला दंड कंपनीने पहिल्या टप्प्यात ग्राहक संस्थेला देण्यास तयारी दर्शविली आहे. ही रक्कम ७.५ ऑस्ट्रेलियन डॉलर एवढी आहे. ऑस्ट्रेलियामधील ग्राहक नियमांचा भंग केल्याप्रकरणी ठोठावलेला हा दंड आजपर्यंतचा सर्वाधिक आहे.
हेही वाचा-एलजीचा दोन डिसप्ले असलेला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या आकर्षक वैशिष्ट्ये
चारचाकीमधून होणाऱ्या प्रदूषणाचे उत्सर्जन कमी दिसण्यासाठी कंपनीने त्यामध्ये सॉफ्टवेअर बसविल्याचा फोक्सवॅगनवर आरोप आहे. यापूर्वीच कंपनीने ऑस्ट्रेलियन स्पर्धा आणि ग्राहक आयोगात कमी असलेला दंड भरण्याची तयारी दर्शविली होती. तो दंड योग्य असल्याचेही कंपनीने म्हटले होते.